॥ तुम रक्षक काहू को डर ना ॥

- १८ ते ६० वयोगटातील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते.
- वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे.
- रक्तदात्याने आधी किमान तीन महिने रक्तदान केलेले नसावे.
- उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.
-तसेच मागील १६ वर्षात कावीळ, गेल्या वर्षभरात मलेरिया,कांजण्या किंवा एखादी शस्त्रक्रिया झालेली नसावी.हयाबरोबरच इतरही अनेक आजारांची शहानिशा करावी लागते.
- रक्तदान करण्यापूर्वी किमान ३ तास आधी पोटभर जेवून घ्यावे.
- रक्तदान झाल्यावर तुम्हाला दिलेला नाश्ता खा. नंतर व्यवस्थित जेवा.
- रक्तदानाच्या एक दिवस आधी धूम्रपान करणे थांबवा. रक्तदान झाल्यानंतर ३ तासांनी तुम्ही धूम्रपान करू शकता.
- रक्तदानाच्या ४८ तास आधी जर तुम्ही मद्य घेतले असेल तर तुम्ही रक्तदान करू शकणार नाही.

दर २ सेकंदांनी कोणा ना कोणा व्यक्तीला रक्ताची गरज भासते. तुमच्या रक्तामुळे एकाच वेळी अनेकजणांचे प्राण वाचू शकतात. अपघात झालेल्या व्यक्ती, वेळेआधीच जन्मलेली बालके, मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाणारे रुग्ण यांना पूर्ण रक्ताची गरज असते जिथे तुमच्या रक्ताची आवश्यक ती तपासणी झाल्यावर ते रक्त थेट वापरले जाते. अपघात, रक्तक्षय किंवा इतर काही शस्त्रक्रियांनी त्रस्त असणा-या व्यक्तींना मुख्यत्वे केवळ लाल रक्तपेशींची गरज असते ज्या तुमच्या रक्तातून वेगळ्या केल्या जातात.